मुंबईत पोलीस शिपायाची आत्महत्या; कारण अस्पष्ट, तपास सुरू

Spread the love

मुंबईत पोलीस शिपायाची आत्महत्या; कारण अस्पष्ट, तपास सुरू

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून आझाद मैदान पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. किशोर म्हस्के असे मृत शिपायाचे नाव असून त्यांनी मंगळवारी घाटकोपर येथील राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हस्के हे घाटकोपर परिसरातील सरकारी पोलीस वसाहतीत अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. मंगळवारी त्यांनी घरातच टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी (सुसाईड नोट) आढळून न आल्याने कौटुंबिक वाद, कामाचा ताण किंवा अन्य कारणांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पोलीस दलातही हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon