कुलाब्यात झाडाची फांदी कोसळून एकाचा मृत्यू; काही जखमी

Spread the love

कुलाब्यात झाडाची फांदी कोसळून एकाचा मृत्यू; काही जखमी

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर कुलाबा परिसरात झाडाची फांदी कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

पोलीस महासंचालक कार्यालयासमोर गुलमोहराच्या झाडाची मोठी फांदी अचानक तुटून रस्त्यावर कोसळली. त्यावेळी तेथून जाणाऱ्या वाहनांवर ही फांदी पडल्याने चार वाहने नुकसानग्रस्त झाली. या अपघातात अडकलेल्या जखमींना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अनिल भगोजी मोरे (४५) यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पडलेली फांदी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon