राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद पार

Spread the love

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद पार

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद पार पडली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेऊन गुन्हेगारी नियंत्रण, तपास प्रक्रियेतील गती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर या बैठकीत भर देण्यात आला.

या परिषदेला राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील विविध जिल्ह्यांतील गुन्हेगारीचे स्वरूप, सायबर गुन्ह्यांची वाढ, तसेच नागरिकाभिमुख पोलिसिंगसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा झाली.

परिषदेत गुन्हे उकल दर वाढविणे, महिलांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई, तसेच पोलीस यंत्रणेतील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपास अधिक सक्षम करण्यावरही भर देण्यात आला.

राज्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक कार्यक्षम बनविण्याच्या दृष्टीने या परिषदेतील निर्णय महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon