महाराष्ट्रतील राजकारणात मोठा भूकंप!
मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीसोबतचा कथित व्हिडिओ व्हायरल; राजीनाम्याची मागणी करत विरोधक आक्रमक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – भोंदूबाबा अशोक खरात याचे काही धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, राज्यभरात खळबळ उडाली. यादरम्यानच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील राज्यातील एक बडा मंत्री मोठ्या अडचणीत सापडला आहे. थेट या बड्या मंत्र्याचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला, त्याने खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे हा मंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत बेडवर दिसत आहे. कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात नक्की सुरू तरी काय आहे? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. थेड बेडवर तो तृतीयपंथी व्यक्ती आणि मंत्री महोदय दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओनंतर थेट या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणीच विरोधकांकडून केली जात आहे. हा मंत्री दुसरा तिसरा कोणीही नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे आहेत. समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये नरहरी झिरवाळ हे स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडीओ सात महिन्यांपूर्वीचा असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नरहरी झिरवाळ यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चांगलीच खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. यासोबतच व्हिडीओमध्ये दारूच्या काही बॉटल्स देखील बघायला मिळत आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नरहरी झिरवाळ यांच्यासोबत तृतीयपंथी पवन यादव दिसत आहे. तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांचा फोन स्विच्ड ऑफ असल्याचे सांगितले जात आहे. जयंत पाटील यांना या व्हिडीओबद्दल विचारले असताना त्यांनी म्हटले की, मी हा व्हिडीओ बघितला नाही. व्हिडीओ पहिल्यावरच प्रतिक्रिया देणे योग्य असल्याचे त्यांनी म्हटले.
आता या व्हायरल व्हिडीओनंतर विरोधक आक्रमक झाले असून शासकीय निवासस्थानी असे कार्यक्रम केले जात आहेत का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विरोधत झिरवाळ यांच्या राजीनाम्याकरिता आक्रमक आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नक्की काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच स्विकारण्याचे प्रकरण घडले असताच आता हा व्हिडीओ पुढे आला.
आता या कथित व्हायरल व्हिडीओनंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते.