शांतीनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना सुपूर्द
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी : शांतीनगर पोलीस ठाण्याच्या दक्ष आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर गहाळ झालेले मोबाईल शोधून संबंधित नागरिकांना परत देण्यात आले. या कारवाईमुळे मोबाईल हरवलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान आणि आनंद दिसून आला.
पोलीसांनी अत्याधुनिक तांत्रिक प्रणालीचा वापर करत विविध ठिकाणी तपासाची चक्रे फिरवली. तसेच, तत्परतेने केलेल्या कारवाईमुळे अल्पावधीतच मोबाईल शोधण्यात यश आले.
मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी शांतीनगर पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या विश्वासासाठी पोलीस दल सातत्याने कार्यरत असून, ‘पोलीस आपल्या सेवेत सदैव तत्पर’ ही प्रतिमा या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाली आहे.