भिवंडी सब-जेलमधून फरार सराईत गुन्हेगार कोल्हापूरमध्ये ताब्यात

Spread the love

भिवंडी सब-जेलमधून फरार सराईत गुन्हेगार कोल्हापूरमध्ये ताब्यात

महेंद्र (अण्णा) पंडीत / वार्ताहर

भिवंडी : भिवंडी येथील सब-जेलमधून फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला कोल्हापूर येथे ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.

नारपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील हे कर्तव्यावर असताना पोलीस हवालदार सस्कर (बकल नं. ३४७३) यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १२४/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम २६२) मधील फरार आरोपी रवींद्र धनाजी भोसले (वय २४, रा. साठे नगर, भिवंडी) हा कोल्हापूर येथील रंकाळा परिसरात असल्याचे समजले.

या माहितीच्या आधारे नारपोली पोलिसांनी तत्काळ कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेशी (एलसीबी) संपर्क साधला. संयुक्त कारवाईत संबंधित आरोपीला १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, आरोपीला ताब्यात घेण्यासाठी शांतीनगर पोलीस ठाण्याची पथक कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon