आधारवाडी कारागृहाबाहेर ‘सत्या भाई’चा वाढदिवस साजरा; समर्थकांची फटाक्यांची आतषबाजी, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Spread the love

आधारवाडी कारागृहाबाहेर ‘सत्या भाई’चा वाढदिवस साजरा; समर्थकांची फटाक्यांची आतषबाजी, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : कल्याणमधील आधारवाडी मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर कुख्यात गुंड सतीश कांबळे उर्फ ‘सत्या भाई’ याचा वाढदिवस साजरा केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. कारागृहात बंद असलेल्या या गुंडाच्या समर्थकांनी जेलच्या मुख्य गेटसमोर फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करत जल्लोष केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांच्या भूमिकेबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश कांबळे उर्फ ‘सत्या भाई’ हा सध्या आधारवाडी कारागृहात बंद आहे. त्याचा वाढदिवस असल्याच्या निमित्ताने काही समर्थक शनिवारी रात्री कारागृहाबाहेर जमले. यावेळी त्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर फटाके फोडत मोठा जल्लोष केला. या प्रकाराचा व्हिडिओ काही नागरिकांनी चित्रीत करून सोशल मीडियावर प्रसारित केला.

कारागृहासारख्या संवेदनशील ठिकाणाच्या मुख्य गेटसमोर अशा प्रकारे जल्लोष करण्यात येत असल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीही आधारवाडी कारागृहाबाहेर काही गुन्हेगारांच्या समर्थकांकडून अशा प्रकारचे जल्लोष केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई केली जाणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon