मानखुर्द पोलिसांची तत्परता; फाशी घेणाऱ्या तरुणाचे प्राण वाचवले

Spread the love

मानखुर्द पोलिसांची तत्परता; फाशी घेणाऱ्या तरुणाचे प्राण वाचवले

रवि निषाद / मुंबई

मानखुर्द परिसरातील साठेनगर येथील सिताराम धाम चाळीत फाशी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचे प्राण मानखुर्द पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले. बीट मार्शलच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे ही दुर्घटना टळली.

मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल क्रमांक १ चे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका महिलेच्या आरडाओरडाचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता साठेनगरमधील सिताराम धाम चाळीत एका घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले.

अंमलदार श्री. काटकर आणि श्री. आहेर यांनी तात्काळ दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील तरुणाने पंख्याला फास लावून स्टूल खाली फेकलेले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्या तरुणाला वर उचलून धरत फासावरून खाली उतरवले आणि त्याचे प्राण वाचवले.

घटनेनंतर संबंधित महिलेने आपल्या मुलाचे प्राण वाचवल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले. पुढील काळात त्या तरुणाच्या पुनर्वसनासाठी पोलिसांनी आईच्या परवानगीने त्याला व्यसनमुक्तीसाठी सुधारगृहात पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon