महिला उद्योजकतेसाठी वैशालीताई पाटील यांचा पुढाकार; ‘उमेद महिला मॉल’द्वारे व्यवसायाच्या नव्या संधी

Spread the love

महिला उद्योजकतेसाठी वैशालीताई पाटील यांचा पुढाकार; ‘उमेद महिला मॉल’द्वारे व्यवसायाच्या नव्या संधी

पुणे : राज्य शासनाच्या महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या धोरणांना बळ देण्यासाठी कुसुमवत्सल्य फाउंडेशन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने महिलांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. वैशालीताई पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात महिलांना स्वावलंबनाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली तसेच महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे व्हावे याबाबत मार्गदर्शन देण्यात आले. विशेषतः ‘उमेद महिला मॉल’ या संकल्पनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसायाच्या नव्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात, बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय कसा उभारता येतो आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी महिला सक्षमीकरण प्रवक्ता सौ. पंचशीला कुंभारकर यांनी उपस्थित महिलांना बचत गट, शासकीय योजना आणि स्वयंपूर्ण व्यवसायाच्या संधींबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास मान्यवर पाहुणे म्हणून लक्षमीताई वाघमारे, निलेश खंडाळे, रमाताई आठवले आणि नीता रसाळकर यांची उपस्थिती लाभली.
दरम्यान, कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्थापक अध्यक्षा सौ. वैशालीताई पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon