राज्य पुरस्कार परीक्षेत एमपीएस देवनार कॉलनी इंग्रजी शाळा क्र.२ च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश !
रवि निषाद / मुंबई
मुंबई -: मानखुर्द येथील एमपीएस देवनार कॉलनी इंग्रजी शाळा क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कार परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
मिळाली माहितीनुसार या शाळेच्या स्काऊट-गाईड पथकातील प्रविण पंकज मिश्रा आणि कामरान आलम महताब आलम सिद्दिकी या विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कार परीक्षेत चांगल्या गुणांनी यश संपादन केले. शाळेचे स्काऊट मास्टर कुलदिप पिल्लेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले.
भारत स्काऊट्स अँड गाईड्स संस्थेमार्फत घेतली जाणारी राज्य पुरस्कार परीक्षा ही स्काऊट चळवळीतील अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते. या परीक्षेत विद्यार्थ्यांची शिस्त,नेतृत्वगुण,सामाजिक जबाबदारी तसेच विविध स्काऊट कौशल्यांची सखोल चाचणी घेतली जाते.त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी मोठा सन्मान मानला जातो. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल एम.पूर्व/१ वॉर्डचे प्रशासकीय अधिकारी विजय जाधव,विभाग निरीक्षिका दीपा गोसावी,क्षेत्रसंघटक धनाजी शेलवले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका कदम यांनी स्काऊट मास्टर कुलदिप पिल्लेवाड आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या यशामुळे एमपीएस देवनार कॉलनी इंग्रजी शाळा क्रमांक २ च्या स्काऊट पथकाचा तसेच संपूर्ण शाळेचा अभिमान वाढला असल्याची भावना शिक्षक व पालकांनी व्यक्त केली.