ठाणेकरांसाठी गुडन्यूज; शहरातील नागरिकांना फक्त १५ ते २०मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणार ठाणे महानगरपालिका

Spread the love

ठाणेकरांसाठी गुडन्यूज; शहरातील नागरिकांना फक्त १५ ते २०मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणार ठाणे महानगरपालिका

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – ठाणे शहरातील नारिकांना आता आता आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेची जास्त वेळ वाट पाहण्यासाठी गरज भासणार नाही.गेल्या काही वर्षात ठाणे शहरात अनेक गोष्टींमुळे नागरिकांचे स्थलांतर वाढलेले आहे. ज्यामुळे या भागात नागरी वस्तीत आरोग्याच्या समस्या आल्याच.

वाढत्या लोकसंख्येमुळे ठाणे शहरात आधीच असलेल्या रुग्णवाहिका कमी पडत असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेने कोरोनातकाळीतल पद्धतीने प्रमाणे परत एकदा भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.आता ठाणे शहरातील नागरिकांना आवश्यक असल्यास फक्त १५ ते २० मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे, असा विश्वास महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केलेला आहे.

ठाण्यातील घोडबंदरपासून ते शिळ या भागातील रुग्णांना अवघ्या काही क्षणात जवळच्या सरकारी रुग्णालयात तर महिलांना प्रसूतिगृहात आणि आरोग्य केंद्रांत नेण्यासाठी या रुग्णवाहिका उपलब्ध होतील.ठाण्यात सध्या महापालिकेचे ३३ आरोग्य केंद्रे तर ६ प्रसूतिगृहे आणि कळवा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची ये-जा होत असते.१५ ते २० मिनिटांत रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहचण्याची सेवा ही फक्त पाच वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दोन वर्षांनंतर दरात ३ टक्के वाढ लागू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon