हडपसरमध्ये गुंडांचा धुमाकूळ; ‘कारवाई करा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या’ – रहिवाशांची पोलिसांकडे मागणी

Spread the love

हडपसरमध्ये गुंडांचा धुमाकूळ; ‘कारवाई करा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या’ – रहिवाशांची पोलिसांकडे मागणी

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : हडपसरमधील गाडीतळ परिसरात गुंडांकडून रहिवाशांना सातत्याने त्रास दिला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारावर पोलिसांनी तातडीने नियंत्रण आणावे; अन्यथा आम्हाला आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी संतप्त मागणी रहिवाशांनी केली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात काही गुंडांकडून कोयते आणि तलवारींचा धाक दाखवत दहशत माजवली जात आहे. रात्रीच्या वेळी धमक्या देणे, दुचाकींमधील पेट्रोल चोरी करणे तसेच लूटमाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक जण घराबाहेर पडतानाही भीतीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परिसरात नियमित गस्त वाढवून गुंडांवर नियंत्रण ठेवावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत पोलिसांकडून परिसरात गस्त वाढवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon