केडगाव बस स्थानकातील चोरीचा उलगडा : कोतवाली पोलिसांकडून अडीच तोळ्याची मोहनमाळ मूळ मालकिणीस परत
पोलीस महानगर नेटवर्क
अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील केडगाव बस स्थानकातून चोरी गेलेली अडीच तोळ्याची मोहनमाळ कोतवाली पोलीस ठाणे पोलिसांनी यशस्वी तपास करून शोधून काढली असून, ती मूळ फिर्यादीकडे परत करण्यात आली आहे.
या कारवाईत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रोहिणी दरंदले यांनी तपास केला. सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी ताराबाई शेलार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
वेळीच केलेल्या तपासामुळे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीचा उलगडा झाल्याने नागरिकांनी कोतवाली पोलिसांच्या कार्यकुशलतेचे कौतुक केले आहे.