परभणीच्या पालक सचिवपदी तुकाराम मुंढे; सामान्य प्रशासन विभागाचे आदेश

Spread the love

परभणीच्या पालक सचिवपदी तुकाराम मुंढे; सामान्य प्रशासन विभागाचे आदेश

पोलीस महानगर नेटवर्क

परभणी : परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तथा कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी (दि. २३) यासंदर्भातील आदेश जारी केले.

या आदेशानुसार परभणी जिल्ह्याची पालक सचिव म्हणून जबाबदारी आता मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर जिल्हा संपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिपक कपूर कार्यरत होते. आता दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले मुंढे हे परभणीचे पालक सचिव म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या या आदेशात राज्यातील सहा जिल्ह्यांतील पालक सचिवांच्या नियुक्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यात गडचिरोली, वर्धा, मुंबई शहर, वाशीम आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील पालक सचिवांच्या नियुक्त्यांचाही समावेश आहे.
कर्तव्यकठोर आणि प्रशासकीय निर्णयक्षमतेसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीमुळे परभणी जिल्ह्यातील प्रशासन अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon