दोन बड्या आयएएस अधिकाऱ्यांची बदली; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्यातील दोन बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय जारी करण्यात आला आहे. डॉ. सुहास दिवसे आणि शैलेश नवाल यांची बदली करण्यात आली आहे.
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून विशेष करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदिवशी आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यात दुसऱ्यांदा दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.
१. डॉ. सुहास दिवसे – कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांची यशदा, पुणे येथे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. शैलेश नवाल – केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत आलेले आणि सेटलमेंट कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.