गैरसमजातून अमानुष मारहाण; तीन मूकबधिर तरुण जखमी, तिघांविरुद्ध गुन्हा

Spread the love

गैरसमजातून अमानुष मारहाण; तीन मूकबधिर तरुण जखमी, तिघांविरुद्ध गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

सातारा जिल्हा : खटाव तालुक्यातील ललगुण येथील एसटी स्टँड परिसरात केवळ दुचाकीकडे पाहून हाताने इशारा केल्याच्या संशयातून तीन मूकबधिर तरुणांना लाकडी दांडे व लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाणे येथे तीन संशयितांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon