पनवेल ग्रामीण पथकाची धडक कारवाई; बनावट विदेशी मद्याची ११.३८ लाखांची तस्करी उघड

Spread the love

पनवेल ग्रामीण पथकाची धडक कारवाई; बनावट विदेशी मद्याची ११.३८ लाखांची तस्करी उघड

पोलीस महानगर नेटवर्क

पनवेल : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेल ग्रामीण पथकाने बनावट विदेशी मद्याच्या तस्करीविरोधात नियोजनबद्ध कारवाई करत तब्बल ११ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पनवेल ग्रामीण भागात उच्च प्रतीच्या विदेशी मद्याच्या नावाखाली बनावट दारूची वाहतूक व विक्री सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्या आधारे पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यात मोठ्या प्रमाणात बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या, लेबले, पॅकिंग साहित्य तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले साधन जप्त करण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या तिघांची चौकशी सुरू असून या तस्करीमागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच मद्यनिर्मितीचा स्रोत कोणता आहे, याचा शोध घेतला जात आहे. जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या अशा बनावट मद्याच्या तस्करीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon