सांताक्रुझमध्ये बंद खोलीत आढळला तरुणाचा मृतदेह; बोथट हत्याराने मारहाण झाल्याची माहिती, पोलिसांकडू तपास सुरु

Spread the love

सांताक्रुझमध्ये बंद खोलीत आढळला तरुणाचा मृतदेह; बोथट हत्याराने मारहाण झाल्याची माहिती, पोलिसांकडू तपास सुरु

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईच्या सांताक्रुझ पूर्वेत वाकोला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका बंद खोलीत ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. बोथट हत्याराने मारहाण झाल्याची माहिती वडिलांकडून देण्यात आली आहे. मृतकाच्या वडिलांना पोस्टमोर्टमनंतर डॉक्टरांनी ही माहिती दिल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मृत रणजित हा त्याचा मित्र विक्कीसह वाकोल्यात राहत होता. दोघांमध्ये भांडण झाल्याबाबत शेजाऱ्यांनी माहिती दिली आहे. दुसऱ्या दिवशी विक्की सकाळीच बॅग घेऊन निघाला होता. त्यानंतर घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं होतं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून पोलीस विक्कीचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon