महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी प्रसिद्ध लोखंडवाला बिल्डरसह एसआरए च्या कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल

Spread the love

महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी प्रसिद्ध लोखंडवाला बिल्डरसह एसआरए च्या कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईतील प्रसिद्ध लोखंडवाला बिल्डरला मोठा झटका बसला आहे. मेसर्स लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि लोखंडवाला डी बी रियालिटी या दोन्ही कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोखंडवाला बिल्डरसह एसआरएचे कार्यकारी अभियंता डी बी पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पाच्या जागेवर महापालिकेची परवानगी न घेता संक्रमण शिबिर उभारण्यात आले. बिल्डरांना नियमबाह्य परवानगी दिली होती. सदर जागेवर महापालिकेचा एसटीपी प्लांट उभारला जाणार होता. एसटीपी प्लांट ची जागा हडप करण्याचा प्रयत्न केला गेला. एसटीपी प्लांटसाठी राखीव असलेल्या जागेवर संक्रमण शिबिर उभारले जात होते.

महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी मेसर्स लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि लोखंडवाला डी बी रियालिटी या दोन कंपन्यांसह एसआरएचे कार्यकारी अभियंता डी बी पाटील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. तसेच माहितीच्या अधिकारातून त्रिके प्रकल्पाबाबत माहिती घेवून पाठपुरावा केला होता. अखरे या प्रकरणात मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon