नाशिक रोड : उपचारादरम्यान वाहतूक पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांचे दुःखद निधन

Spread the love

नाशिक रोड : उपचारादरम्यान वाहतूक पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांचे दुःखद निधन

पोलीस महानगर नेटवर्क

उल्हासनगर : विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार स्व. प्रशांत साहेबराव पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्रकृती अचानक बिघडली. तातडीने त्यांना नाशिक रोड येथील खाजगी रेडियंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी केलेल्या सर्व प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले.

स्व. प्रशांत पाटील हे कर्तव्यनिष्ठ, मनमिळावू व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पोलीस दलात तसेच कुटुंबीय, मित्रपरिवार व सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांचा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon