मुंबईपासून १०० सागरी मैल अंतरावर मोठी खळबळ; थेट तीन संशयास्पद जहाज तटरक्षक दलाने घेतले ताब्यात

Spread the love

मुंबईपासून १०० सागरी मैल अंतरावर मोठी खळबळ; थेट तीन संशयास्पद जहाज तटरक्षक दलाने घेतले ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – भारतीय तटरक्षक दलाने मुंबईच्या किनाऱ्यापासून सुमारे १०० मैल अंतरावर मोठी कारवाई केली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली. मुंबईच्या किनाऱ्याच्या अत्यंत जवळ तीन मोठ्या जहाजांवर कारवाई करण्यात आली. मोठे रॅकेट उद्धवस्थ केले. मुंबई पश्चिमेच्या १०० सागरी मैल अंतरावर तटरक्षक दलाला संशयास्पद तीन जहाज अढडळली. या जहाजांवर पाळत ठेवली गेली. या दरम्यान भारतीय तटरक्षक दलाकडून जहाजांची तपासणी करण्यात आली आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली, त्यावेळी मोठा खुलासा झाला.

तटरक्षक दलाने जहाजांची तपासणी केली असता या जहाजांचे मालक अन्य देशात स्थायिक झाल्याची माहिती मिळाली.५ फेब्रुवारीपासून या जहाजांवर तटरक्षक दलाची बारीक नजर होती. शिवाय संशयास्पद गोष्टी जहाजांवर घडत होत्या. मग थेट तटरक्षक दलाने जहाजाची तपासणी केली. चाैकशीदरम्यान स्पष्ट झाले की, तेलतस्करी करणारे हे जहाज आहेत.

तटरक्षक दल ५ फेब्रुवारीपासून जहाजांवर पाळत ठेऊन होते. शेवटी शनिवारी ७ जानेवारी २०२६ रोजी कारवाई करण्यात आली. ही तीन जहाजे समुद्रात तेल आणि अन्य तेलजन्य उत्पादने दुसऱ्या जहाजात बेकायदा हस्तांतरण करत असल्याचे स्पष्ट झाले. चाैकशीनंतर ही तिन्ही जहाज मुंबई बंदरात आणली असून पुढील कारवाई केली जात आहे. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले

भारतीय तटरक्षक दलाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली. शिवाय तिन्ही जहाजातील कर्मचारीही भारताच्या ताब्यात आहेत. प्रत्येक अॅंगलने या घटनेचा तपास केला जात आहे. भारतीय तटरक्षक दलाने इतकी मोठी कारवाई मुंबईपासून अगदी जवळ केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही जहाज नक्की कुठून आली आणि मुंबईच्या किनारपट्टीहून कुठे जाणार होती, याचा तपास केला जात आहे. मागील काही दिवसांपासून समुद्रातील कारवाईचा जोर वाढला आहे. प्रत्येक जहाजावर भारतीय तटरक्षक दलाच्या बारीक नजरा असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon