लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; प्रियकराविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक;
प्रियकराविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

भिवंडी – भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरानेच आपल्या प्रेयसीसोबत केलेल्या कृत्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणाने २१ वर्षीय तरुणीची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडित तरुणीशी प्रेमसंबंध ठेवत तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र विश्वास मिळवल्यानंतर त्याने तिच्या इच्छेविरुद्ध गैरकृत्य केले असा आरोप पीडितेने केला आहे.

पीडित तरुणी आणि सूरज बालाजी लहुते (२३) यांची ओळख काही महिन्यांपूर्वी झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. आरोपीने वारंवार लग्न करणार असल्याचे सांगत तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एकांतात भेटी दरम्यान त्याने तिच्यावर जबरदस्ती केल्याचे तक्रारीत नमूद आहे. इतकेच नव्हे तर या घटनेबाबत कुणालाही सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेकडून सोन्याचे दागिनेही घेतल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे तरुणी मानसिक तणावात होती. अखेर तिने नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पीडितेच्या तक्रारीवरून नारपोली पोलिसांनी आरोपी सूरज लहुते याच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon