जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरुन दोन मित्रांमध्ये कडाक्याचं भांडण; एका मित्रा कडून दुसऱ्यावर कोयत्याने सपासप वार
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन जिवलग मित्रांमध्ये जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून वाद झाला, या वादातून वार केल्यानं दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. दोन मित्रांची भांडण ही मैत्रिणीला फोन लावण्यावरू झाली आणि त्यातून आपल्याच मित्रावर कोयता हल्ला केल्याची घटना पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात घडली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात २ फेब्रुवारीला रात्री आठ वाजता ही घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, या थरारक सीसीटीव्ही आधार घेत पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चव्हाण असं हल्ला करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाचं नाव आहे.
आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण हे दोघे चांगले मित्र आहेत. दोघेही दोन फेब्रुवारीला संध्याकाळी भारती विद्यापीठ परिसरातील उसाच्या गाडी जवळ उभे होते. गप्पा मारत असताना जुन्या मैत्रिणीची आठवण निघाली आणि त्या मैत्रिणीला फोन करण्यावरून दोघांमध्ये भांडण झाली. हीच भांडण टोकाला गेला आणि आदित्य कांबळे याने मित्र चेतन चव्हाण यांच्यावर थेट कोयत्याने वार करायला सुरुवात केली, या हल्ल्यात चेतन गंभीर जखमी झाला आहे, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत देखील झाली आहे, पुण्यातील भारतीय विद्यापीठ रुग्णालयात चेतन वर सध्या उपचार सुरू आहे.
या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी चेतन चव्हाण याला तातडीने उपचारासाठी भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत देखील झाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. आरोपी आदित्य कांबळे याच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. किरकोळ वादातून थेट कोयता हल्ल्यापर्यंत गेलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील तरुणांमधील वाढत्या हिंसक प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती.