मीरा–भाईंदरमध्ये नवघर पोलीस ठाण्यातून फरार आरोपी १२ तासांत जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
मीरा–भाईंदर : नवघर पोलीस ठाण्यातून फरार झालेल्या आरोपीला अवघ्या १२ तासांत पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची तातडीने नेमणूक करून व्यापक शोधमोहीम राबवण्यात आली होती.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. मिळालेल्या सुरागांच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना करण्यात आली होती. अखेर काही तासांतच आरोपीला शोधून काढून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांच्या या जलद आणि समन्वयित कारवाईमुळे फरार आरोपीला अल्पावधीत अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.