रोहित शेट्टीच्या घरावरती गोळीबार!
पुण्यासह लॉरेन्स बिश्नोईचं कनेक्शन, अटक आरोपींची ना गुन्हेगारी पार्श्वभूमी ना कोणत्या टोळीशी संबंध
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या जुहूतील बिल्डिंगवर गोळीबार झाला. सुदैवाने या गोळीबारात कोणी जखमी नाही पण या गोळीबारामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणी पोलिसांना पाच संशयित आरोपींना पुण्यातून अटक केली आणि हे चार आरोपी बिश्नोई गॅंगचे असल्याचं समजतंय. रोहित शेट्टी याच्या घरावर झालेला गोळीबार आणि अटक करण्यात आलेले आरोपी राज्याला पुन्हा एकदा बिश्नोई गॅंगची आठवण करुन देणारा आणि धोकादायक प्रसंग आहे.
रोहित शेट्टी बॉलीवूडचा स्टंटचा बादशाह म्हटलं तरी हरकत नाही. याच रोहित शेट्टीच्या घरावर मध्यरात्री गोळीबार झाला. एक- दोन नाही तर थेट पाच राऊंड फायर केले. लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या पाच संशयितांना पुणे पोलिसांसांनी अटक केली. मात्र धक्कादायक हे आहे की या पाच पैकी एक संशयित सोडला तर बाकी कोणाचाही कोणत्याची गुन्ह्यांशी संबंध नाही आणि पार्श्वभूमी नाही. पाच जणांना अटक केली. त्याचं ना कोणती गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. ना ते कोणत्या टोळीशी संबंधित आहेत. मग ते या प्रकरणात कसे आले याचाही तपास सुरू आहे.
अमन आनंद मारोठे – २७,आदित्य ज्ञानेश्वर गायके – १९,सिद्धार्थ दीपक येनपुरे – २०, समर्थ शिवशरण पोमाजी – १८ आणि स्वप्नील सकट – २३ अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.लॉरेन्स बिश्नोई गॅंगशी संबंधित असलेले हे संशयित आरोपी आहेत. मात्र ज्यांनी गोळीबार केला त्यांचा अजून शोध सुरु आहे. लॉरेन्स बिश्नोई गॅंगमध्ये गुन्हेगारीची पार्श्वभूमी नसलेले तरुण आहेत. त्यांना गुन्हेगारीकडे ओढणं आणि त्यांना थेट सांगेल तिथे गोळीबार करायला लावणं हीच लॉरेन्स बिश्नोई गॅंग खासियत आहेत.
लॉरेन्स बिश्नोई गॅंगने या पूर्वीदेखील थेट गोळीबार करत हत्या केल्या आहेत. प्रसिद्ध पंजाबी गायक २०२२ मध्ये सिद्धू मूसेवालाची हत्या केली. एप्रिल २०२४ मध्य वांद्रे येथील सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता, ज्याची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे हत्या करण्यात आली.
गुन्हेगारीची पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवायचं आणि त्यांच्याकडून गुन्हा गोळीबार, खंडणीसारखे गुन्हे करुन घ्यायचे. मात्र लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या या गुन्हेगारीच्या तऱ्ह्यांमुळे पोलीस मात्र कायम चक्रावतात. गुन्हा घडला की सुरुवातीला पोलीस थेट टोळ्यांची माहिती काढतात आणि संशयितांना ताब्यात घेतात, मात्र लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या या गुन्हेगारीशी काहीही संबंध नसलेल्या तरुणांना ताब्यात घेणं पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत चाललंय. एकीकडे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलाय.