लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे अकस्मात निधन

Spread the love

लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे अकस्मात निधन

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे शनिवारी मध्यरात्री अकस्मात निधन झाले. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

कुंभार हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे गावचे रहिवासी होते. त्यांच्या पार्थिवावर चावरे (ता. हातकणंगले) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सध्या ते पुण्यातील वडगावशेरी परिसरात वास्तव्यास होते.

कुंभार यांनी आपल्या सेवाकाळात विविध ठिकाणी कार्यरत राहून कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या अकस्मात निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली असून सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon