कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आउट, शिंदेंची चांदी तर मनसेचे इंजिनही धावणार; महापौरपदाचं चित्र स्पष्ट
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण : राज्यात २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी निकाल जाहीर झाले. या निकालांनंतर कुठे, कोणत्या पक्षाचा महापौर होणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. अखेर गुरुवारी महापौरपदाच्या आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. यावेळी पालिकांच्या नावाच्या चिठ्ठ्या बॉक्समध्ये टाकण्यात आल्या. यात पहिली सोडत ST प्रवर्ग, अनुसूचित जमातींसाठी काढण्यात आली.यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर पदासाठीचं आरक्षण ST प्रवर्गासाठी जाहीर झालं आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत ST प्रवर्गातील महापौर असणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर पदासाठीचं आरक्षण ST प्रवर्गासाठी जाहीर झालं आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत ST प्रवर्गातील महापौर असणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत तिघांना महापौरपदाची संधी मिळू शकते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत एसटी प्रवर्गातील तीन नगरसेवक आहेत. त्यापैकी शिवसेनेचे ST प्रवर्गातील दोन नगरसेवक किरण भांगले आणि हर्षाली थविल यांनी संधी मिळू शकते. तर दुसरीकडे ST प्रवर्गातील मनसेच्या उमेदवार शीतल मंढारी यांचीही महापौरपदी वर्णी लागू शकते. आता या तीन नगरसेवकांपैकी कोणाची वर्णी महापौरपदासाठी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
केडीएमसीमध्ये भाजपचा एसटी प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही. त्यामुळे इथे भाजपला संधी नाही. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे दोन आणि मनसेचा एक नगरसेवक असल्याने आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचच लक्ष आहे.