पोलिसांची तत्पर कामगिरी : हरवलेले मोबाईल नागरिकांना परत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या राबोडी व नौपाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून हरवलेले मोबाईल फोन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने शोधून काढत संबंधित नागरिकांना परत केले.
नागरिकांनी दिलेल्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी हरवलेल्या मोबाईलची माहिती संकलित करून आधुनिक तांत्रिक प्रणालीद्वारे त्यांचा माग काढला. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे हे मोबाईल यशस्वीरित्या हस्तगत करण्यात आले.
यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते हे मोबाईल फोन संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत ठाणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे कौतुक केले.
हरवलेली मालमत्ता शोधून नागरिकांना परत देण्याच्या या उपक्रमामुळे पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत असून, ठाणे पोलिसांची ही कामगिरी निश्चितच स्तुत्य असल्याचे बोलले जात आहे.