राज ठाकरेंना धक्का; ऐन निवडणुकीत मनसेचा नेता भाजपाच्या गळाला

Spread the love

राज ठाकरेंना धक्का; ऐन निवडणुकीत मनसेचा नेता भाजपाच्या गळाला

योगेश पांडे / वार्ताहर

मिरा भायंदर – राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहते आहे. एकीकडे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे. येत्या १५ जानेवारी रोजी एकूण २९ महापालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर १६ जानेवारी रोजी या सर्व महापालिकांचा निकाल जाहीर केला जाईल. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. सध्या नगरपरिषद आणि नगपरंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत भाजपा तसेच महायुतीच्या शिंदे गट आणि अजित पवार गटाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे महापालिकेच्या निवडणुकीतही अशीच विजयी पताका कायम राहावी म्हणून राज्यात सर्वच ठिकाणी अन्य पक्षाच्या दिग्गजांना भाजपात सामावून घेतले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेला जबर हादरा देत एका बड्या नेत्याने थेट भाजपात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे आता महापालिका निवडणुकीचे गणित बदलले आहे. भाजपाला चांगलीच ताकद मिळाली आहे.

मीरा भाईंदर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) विभाग अध्यक्ष श्रीजीत मोहन यांनी भरतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत इतर ७० कार्यकर्त्यांनाही भाजपाचा झेडां हाती घेतला आहे. या भाजपा प्रवेशावेळी स्थानिक भाजपा आमदार नरेंद्र मेहेता उपस्थित होते. एकीकडे महापालिकेच्या निवडणुकीने राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. असे असताना मनसेच्या या नेत्याने थेट भाजपात प्रवेश केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

श्रीजीत मोहन हे मीरा भाईंदरमधील मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत. त्या भागात मोहन यांना बऱ्यापैकी जनाधार आहे. त्यांच्यासोबत इतर ७० कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केल्यामुळे मीरा भाईंदरमध्ये मनसेचे संघटन कमकुवत झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ऐन महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला मीरा भाईंदरमध्ये पक्षाची नव्याने बांधणी करावी लागणार आहे. तसेच मोहन यांच्या जाण्याने होणारे नुकसान भरून काढण्याठी त्यांच्याच तोडीच्या नेत्याकडे विभाग अध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी लागेल. त्यामुळे आता मीरा भाईंदरच्या निवडणुकीत मनसे नेमकी काय खेळी करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon