चेंबूरमध्ये मनपा–उज्जीवन बँकेचे संयुक्त स्वच्छता अभियान

Spread the love

चेंबूरमध्ये मनपा–उज्जीवन बँकेचे संयुक्त स्वच्छता अभियान

रवि निषाद/ मुंबई

मुंबई : चेंबूर येथील मुंबई महापालिकेच्या ‘एम पश्चिम’ घनकचरा व्यवस्थापन विभागाने उज्जीवन स्मॉल फाइनन्स बँकेच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबवले. या उपक्रमात बँकेचे अधिकारी-कर्मचारी तसेच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत सरकारी तसेच खासगी संस्थांमधील अधिकारी-कर्मचारी एक दिवस स्वच्छतेसाठी योगदान देत आहेत. त्याच अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात आला.

या अभियानात उज्जीवन स्मॉल फाइनन्स बँकेच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट विभागातील कर्मचाऱ्यांसोबत प्रत्यक्ष स्वच्छता कार्यात सहभाग घेतला. परिसरातील सार्वजनिक जागांची स्वच्छता, कचरा संकलन व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एरिया मॅनेजर पारस चौधरी, शाखा व्यवस्थापक जुनैद, ध्यानदेव तसेच अमरीन शेख आणि निशा मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सार्वजनिक-खासगी सहकार्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon