अकोल्यात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेची तिच्याच पार्टनरकडून हत्या; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Spread the love

अकोल्यात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेची तिच्याच पार्टनरकडून हत्या; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

अकोला – लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं किती महागात पडतं, याचा प्रत्येय अकोल्यातील या घटनेतून समोर आलं आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना अकोल्यातील अकोट शहरात घडली आहे. गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या पार्टनरने तिने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केल्याचा बनाव रचला. सध्या पोलिसांनी लिव्ह-इन पार्टनरला अकोल्यातील अकोट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पवन लक्ष्मण इंगळे असं विवाहित महिलेचा खून करणाऱ्या प्रियकराचं नाव आहे.

अकोला जिल्ह्याच्या अकोट शहरात महेश कॉलोनी येथे अविवाहित तरुण पवन इंगळे एका विवाहित महिलेसोबत काही वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होता.७ डिसेंबर रात्री ९ वाजताच्या सुमारास पवन इंगळे याने अकोट शहर पोलीस स्टेशन गाठून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केल्याची आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य पाहत अकोट शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी गळफास घेतलेल्या महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

यासंदर्भात पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली, चौकशी दरम्यान पोलिसांना ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय आल्याने, पोलिसांनी तपास चक्र फिरवत सखोल चौकशी सुरू केली. दरम्यान, उत्तरीय तपासणीच्या अहवालात महिलेचा गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाल्याने पोलिसांचा संशय थेट पवनवर गेला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता पवनला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलिसांनी कौशल्याचा वापर करत आरोपीला खाकीचा हिसका दाखवताच आरोपी पवनने महिलेचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्रेमापोटी पतीला सोडून विवाहित महिला प्रियकर आरोपी तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. काही दिवस दोघांचं चांगलं सुरू होतं, मात्र दोघांमध्ये वादविवाद आणि खटके उडायला सुरवात झाली. या वादविवादात मानसिक छळ होत असल्याची कबुली आरोपी तरुणाने दिली आहे. याच मानसिक छळातून हा खून झाल्याची केल्याची कबुलीही तरुणाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon