उरणमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला; भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

Spread the love

उरणमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला; भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

आमदारांच्या सहभागाचा संशय; उरणमध्ये राजकीय वातावरण तापले

उरण – उरण तालुक्यातील एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पदाधिकारी सतीश पाटील यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे उरण परिसरात तीव्र राजकीय तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यामागे भाजपच्या काही कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका सार्वजनिक कार्यक्रमात सतीश पाटील यांना अचानक काही व्यक्तींनी घेरत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेमागे भाजपच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप करत आमदार महेश बाल्दी यांच्यावरही संशय व्यक्त केला आहे. या आरोपांवर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान, या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या प्रदेश उपाध्यक्ष तथा महिला नेत्या भावना घाणेकर यांनी जखमी सतीश पाटील यांची रुग्णालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

या घटनेनंतर उरण शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

पोलीस प्रशासनाकडून “दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल” असे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या सर्व बाजूंनी माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon