११ आणि ३७ वर्षांपासून फरार असलेले दोन आरोपी अखेर अटकेत; काळाचौकी आणि भोईवाडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई – मुंबई पोलिसांनी दोन दीर्घकाळ फरार असलेल्या आरोपींना जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. काळाचौकी आणि भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पथकांनी स्वतंत्र कारवायांमध्ये ११ वर्षे आणि तब्बल ३७ वर्षे फरार असलेल्या आरोपींना अटक केली.
काळाचौकी पोलीस ठाण्यातील गु.र.क्र. ७८/२०१४ (कलम ३०७, ३२३, ५०४ भादवी) या गंभीर गुन्ह्यातील आरोपी राकेश अमृतलाल पासी हा ११ वर्षांपासून फरार होता. संबंधित न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून तो कोल्हापूर परिसरात लपल्याचे समोर आले. त्यानुसार २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पथकाने कोल्हापुरात धाड टाकून त्याला ताब्यात घेतले व मुंबईत आणून न्यायालयात हजर केले.
दुसऱ्या महत्त्वाच्या कारवाईत, भोईवाडा पोलीस ठाण्यातील गु.र.क्र. १६/१९८८ (कलम ३९७, ३४ भारतीय दंड संहिता व ३७(१)(अ)) या गुन्ह्यातील आरोपी नफीज अब्दुल अजिज शेख (वय ६१) याला अटक करण्यात आली. सोन्याची चेन आणि रोख रक्कम लुटून पसार झालेला आरोपी तब्बल ३७ वर्षे फरार होता. न्यायालयाने त्यास फरार घोषित केले होते. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने घोडेगाव, पुणे येथे शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आणि खात्री करून फेर अटक केली.
या दोन्ही कारवाया पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (कावसु) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, डीसीपी परिमंडळ–४ श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
या मोहिमेत सपोआ श्री. घनश्याम पलंगे, सपोआ श्री. सचिन कदम, वपोनि विजयकुमार शिंदे (काळाचौकी), वपोनि दत्तात्रय ठाकूर (भोईवाडा) तसेच फरारी पथकातील अधिकारी, सपोनि चेतन मराठे, पो.उपनि. पल्लवी जाधव, पो.उपनि. माधुरी पाटील, पो.उपनि. महागावकर, पोउपनि संदेश कदम, स.फौ. सुरेश कडलग, पोह. बारसिंग, पोह. प्रिंदावणकर, पोह. बागी, पो.शि. राठोड, म.पो.शि. लोहार, पो.शि. गावित, म.पो.शि. बेलोस्कर, पो.शि. ओंकार कंक यांनी मोलाची भूमिका बजावली.
मुंबई पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांवर आणखी कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे प्रयत्न भविष्यातही अधिक गतीने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.