ठाणे पोलीस आयुक्तालयात ‘ओपन डे’ : नागरिकांसाठी मार्गदर्शित भेट व कायदेशीर मार्गदर्शनाचा उपक्रम
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयात येत्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजी नागरिकांसाठी पोलिस स्टेशन ओपन डेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायं ४ या वेळेत सर्वांसाठी खुले असलेल्या या उपक्रमात मार्गदर्शित भेट, कायदेशीर मार्गदर्शन तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवादाची संधी मिळणार आहे.
नागरिकांनी उपस्थित राहून पोलीस यंत्रणेचे कार्य, विविध विभागांची कामकाज प्रणाली आणि कायदेशीर प्रक्रियेची माहिती जाणून घेण्याचे आवाहन ठाणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.