ठाणे गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
कोलकाताहून महाराष्ट्रात चरस तस्करी करणारा आरोपी अटक; ₹५ कोटींचा ५.०५० किलो चरस जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे क्राईम युनिटने मोठी कारवाई करत कोलकाताहून महाराष्ट्रात चरस तस्करी करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ५.०५० किलो चरस जप्त करण्यात आला असून त्याची बाजारमूल्य अंदाजे ₹5 कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ पुरवठा करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पुढील तपासात या रॅकेटमागील इतर आरोपी, पुरवठा साखळी व वित्तीय व्यवहार यांचा शोध घेतला जात आहे.
ठाणे पोलिसांनी नशामुक्त समाजाच्या दिशेने ही कारवाई अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर आळा घालण्यासाठी पुढील दिवसांतही अशा धडक मोहीमा राबवण्यात येणार आहेत.