गहाळ सोन्याची चैन वीस मिनिटांत शोधून काढली; ठाणे पोलिसांची तत्पर कार्यवाही
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – सिद्धेश्वर तलाव परिसरात एका नागरिकाची एक तोळ्याची सोन्याची चैन गहाळ झाल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. तक्रार मिळताच पोलीस पथकाने परिसरातील चौकशी, तपास आणि शोधमोहीम जलदगतीने राबवली. त्यांच्या सक्रिय प्रयत्नांमुळे गहाळ चैन शोधून काढण्यात आली आणि ती तक्रारदाराला सुरक्षितरीत्या परत करण्यात आली.
नागरिकांच्या विश्वासाला प्रतिसाद देत ठाणे पोलिसांनी पुन्हा एकदा आपली तत्परता आणि जनसहाय्यक वृत्ती सिद्ध केली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत Dial 112.