स्मशानभूमीजवळ सापडलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा; वडील–मुलगा अवघ्या सहा तासात अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : लोहगाव स्मशानभूमीजवळ महिलेचा मृतदेह सापडताच विमानतळ पोलिसांनी विद्याप वेगाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी येरवड्यात छापा टाकून रवी रमेश साबळे (३५) आणि त्याचे वडील रमेश साबळे (६५) यांना ताब्यात घेतले.
चौकशीत रवीने तीन दिवसांपूर्वी वीट आणि लाकडी दांडक्याने महिलेचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर मृतदेह घरात लपवला होता. दुर्गंधी वाढल्यानंतर त्याने वडिलांच्या मदतीने मृतदेह लोहगाव स्मशानभूमीजवळ फेकला. विमानतळ पोलीस पथकाने अवघ्या सहा तासांत गुन्ह्याचा उलगडा करून दोघांना गजाआड केले.