आयडीएफसी बँकेत कासारवडवली पोलिसांकडून सायबर सुरक्षितता जनजागृती सत्र
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : कासारवडवली पोलीस स्टेशनतर्फे आयडीएफसी बँक, ठाणे येथे सायबर सुरक्षितता आणि सर्वसाधारण सुरक्षा जनजागृतीसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात बँकेच्या कर्मचारीवर्गासह उपस्थित नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, डिजिटल व्यवहारातील सुरक्षितता, कायदा-सुव्यवस्था आणि सतर्कतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी वैयक्तिक माहितीची गोपनीयता, संशयास्पद लिंक/कॉल यांपासून सावधानता आणि सुरक्षित आर्थिक व्यवहार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच परिसरात संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा वाहन दिसल्यास तत्काळ Dial 112 वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
या उपक्रमाद्वारे नागरिक आणि बँक स्टाफमध्ये सायबर सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.