ट्रान्सजेंडर गँगकडून तरुणाचं अपहरण करत सुरतमध्ये लिंगबदल शस्त्रक्रिया; मालवणी पोलीसांनी चार जणांना ठोकल्या बेड्या, तर तिघांचा शोध सुरु
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मालाडमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाडमध्ये ट्रान्सजेंडर गँगने तरुणाचं अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे मालाडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे फक्त अपहरणाचा आरोप नाही तर ट्रान्सजेंडर गँगने या तरुणाचं अपहरण करुन त्याला सुरतला नेवून त्यांचं बळबजबरीने लिंगबदल शस्त्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मालाडच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
मालाडच्या मालवणी परिसरात ट्रान्सजेंडर नेहा खान आणि तिच्या साथीदाराने पीडित तरुणाला मारहाण केली, मग अश्लील व्हिडीओ दाखवून धमकवल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. तर ३ आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती आहे. ट्रान्सजेंडर गँगने २८ ऑक्टोबरला पीडित तरुणाचं अपहरण करुन सुरत नेवून लिंगबदल शस्त्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पीडित मुलगा हा केवळ १९ वर्षांचा आहे. ट्रान्सजेंडर गँगने त्याला मारहाण केली. त्याचं अपहरण करत सुरतला नेलं. तिथे एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर लिंगबदल शस्त्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. पण तरीही अद्याप पूर्ण आरोपी पकडण्यात आलेलं नाही.
पीडित मुलगा हा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याला ट्रान्सजेंडर गँगने पकडत मारहाण केली. त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करुन थेट सुरतला जबरदस्ती नेलं. ट्रान्सजेंडर तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सुरतमध्ये एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर लिंगबदलाची शस्त्रक्रिया करुन घेतली. आरोपी ट्रान्सजेंडर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित तरुणाला भिक्षा मागण्यास भाग पाडलं. तसेच त्याच्याकडून पैसे उकळले. अखेर पीडित तरुणाला योग्य संधी मिळाली आणि तो त्यांच्या तावडीतून निसटला. त्याने थेट मालवणी पोलीस ठाणे गाठलं. तिथे त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दाखल घेत आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणी चार जणांनी अटक करण्यात आली. तर तिघांचा शोध सुरु आहे. दरम्यान, ट्रान्सजेंडर गँगकडून याआधीदेखील असा कोणता प्रकार करण्यात आला आहे का? अशी घटना आणखी कुणासोबत घडली आहे का? याचा शोध मालवणी पोलीस करत आहेत. या प्रकरणात आता काय-काय नवी माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं आहे.