अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, अचानक बेशुद्ध झाल्याने रुग्णालयात दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – बॉलिवूड अभिनेता गोविंदाची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडली. मिळालेल्या माहितीनुसार, डिसओरिएंटेशनमुळे गोविंदाची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक उपचारानंतर त्यांना मंगळवारी रात्री १ वाजता तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोविंदाचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी याबाबत माहिती दिली. सध्या गोविंदावर क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
“गोविंदाजी अचानक बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना क्रिटीकेअर रुग्णालयात नेण्यात आले. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत,” असे बिंदल यांनी सांगितले. परंतु त्यांच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
गोविंदाच्या बाबतीत अलीकडील काळात घडलेली ही पहिलीच मेडिकल इमर्जन्सी नाही. ऑक्टोबर २०२४ मध्ये, घरी असताना त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने चुकून पायात गोळी झाडली गेली होती. त्यावेळी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २०२१ मध्ये कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.