ठाणे पोलीस आयुक्तालयात ‘तक्रार निवारण दिन’ यशस्वी; ८६९ अर्जदारांना प्रत्यक्ष दिलासा!
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयात “१०० दिवसांच्या कृती आराखड्या” अंतर्गत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडला.
या उपक्रमासाठी एकूण ११६७ अर्जदारांना आमंत्रित करण्यात आले होते, त्यापैकी ८६९ अर्जदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते.
तक्रार निवारण दिनादरम्यान ७६९ अर्जांचे तत्काळ निवारण अर्जदारांच्या समक्ष करण्यात आले. उर्वरित अर्जदारांच्या तक्रारींचे निरसन लवकरच करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी ठाणे शहर पोलीसांविषयी समाधान व्यक्त केले असून, पोलीस प्रशासनाच्या तत्परतेबद्दल विशेष आभार मानल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी,
पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर यांनी सांगितले.