भिवंडी पोलिसांची मोठी कामगिरी! एक्स-रे डीआर मशीन व लॅपटॉप चोरी प्रकरणाचा उलगडा, चार आरोपी अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी – भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हा क्रमांक ९८४/२०२५ अंतर्गत पोलिसांनी मोठी कामगिरी करत ₹५ लाख २५ हजार रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून एक्स-रे डीआर मशीन तसेच डेल कंपनीचा लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे चोरी गेलेला माल पुन्हा हस्तगत करण्यात यश आले आहे. पुढील तपास भिवंडी शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.