मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षाची धडाकेबाज कारवाई; ₹७.०१ कोटींचा ड्रग्ज साठा जप्त, ९ तस्कर अटकेत!

Spread the love

मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षाची धडाकेबाज कारवाई; ₹७.०१ कोटींचा ड्रग्ज साठा जप्त, ९ तस्कर अटकेत!

सुधाकर नाडार / मुंबई

 

मुंबई – गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने शहरातील विविध भागांत राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान तब्बल ₹७.०१ कोटींचा अमली पदार्थ साठा जप्त करत ९ तस्करांना अटक केली आहे. या कारवाईत एक नायजेरियन नागरिकाचाही समावेश असून, मुंबईतील सहा ठिकाणी एकाच वेळी धाड टाकण्यात आली.

अनेक ठिकाणी समांतर छापे:

कुर्ला, माझगाव, गोवंडी, बोरिवली, वाकोला आणि घाटकोपर परिसरात एकाच वेळी हाती घेतलेल्या या कारवाईत पोलिसांनी ५२३ ग्रॅम कोकेन, २११ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), आणि २४,९०० नायट्रोजेपम टॅब्लेटस् असा मोठा अमली पदार्थ साठा जप्त केला आहे.

वाकोला कारवाई:

११ ऑक्टोबर २०२५ रोजी सांताक्रुझ (पूर्व) येथील वाकोला परिसरात पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकाच्या ताब्यातून ५२३ ग्रॅम कोकेन (बाजारभाव ₹५.२३ कोटी) जप्त केले.

कुर्ला, माझगाव, बोरिवली व घोडपदेव भागात छापे:

या भागांतील स्वतंत्र कारवायांतून ५ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २११ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) (किंमत ₹५४.६५ लाख) जप्त करण्यात आले.

घाटकोपर पोलिसांची कारवाई:

पूर्वी दाखल असलेल्या प्रकरणाच्या तपासादरम्यान, उत्तर प्रदेशमधून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. या तपासात आणखी ३ आरोपींना अटक करत २४,९०० नायट्रोजेपम टॅब्लेटस् (किंमत ₹१.२४ कोटी) जप्त करण्यात आले.

या कारवाईचे नेतृत्व पोलीस आयुक्त मा. देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
अंमली पदार्थ विरोधी युनिटचे डीसीपी नवनाथ ढवळे, एसीपी सुधीर हिरडेकर, तसेच विविध युनिटचे प्रभारी अधिकारी, पो. नि. शशिकांत जगदाळे (कांदिवली), अनिल ढोले (घाटकोपर), विशाल चंदनशिवे (बांद्रा), राजेंद्र दहिफळे (आझाद मैदान) आणि संतोष साळुंखे (वरळी) यांनी या मोहिमेत विशेष भूमिका बजावली.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सलग सहा कारवायांमुळे शहरातील अंमली पदार्थ तस्करीचे जाळे उद्ध्वस्त झाले आहे. “अंमली पदार्थमुक्त मुंबई” हे स्वप्न साकार करण्यासाठी पोलिसांचे पथक सतत प्रयत्नशील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon