CEIR पोर्टलची प्रभावी कामगिरी; खडकपाडा पोलिसांकडून दिवाळीपूर्वी हरवलेले २५ मोबाईल परत!
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – खडकपाडा पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने आणि CEIR पोर्टलच्या मदतीने ₹३,६५,००० किमतीचे २५ हरवलेले मोबाईल शोधून तक्रारदारांना परत करण्यात आले.
दिवाळीच्या मुहूर्तावर आयोजित या उपक्रमात नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. हा उपक्रम सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
या कार्यवाहीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, “नागरिकांचा विश्वास आणि पोलिसांची जवाबदारी” या घोषवाक्याला प्रत्यक्षात उतरविण्याचे उत्तम उदाहरण या उपक्रमातून पाहायला मिळाले.