घाटकोपर येथे सिलिंडर ब्लास्टचा धमाका; चार जण गंभीर जखमी

Spread the love

घाटकोपर येथे सिलिंडर ब्लास्टचा धमाका; चार जण गंभीर जखमी

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – कामगारांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घाटकोपर येथील नीलधारा इमारत परिसरात घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चौघा जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. जखमी झालेल्या चौघांपैकी दोघे जण ६० ते ७० टक्के भाजल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.

घाटकोपर पूर्वीकडील विद्यानिकेतन कॉलेजजवळ ६० फूट रस्ता, जैनमंदिराच्या समोर ‘नीलधारा’ या बांधकाम सुरु असलेल्या सात मजली इमारतीजवळ कामगारांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये मंगळवारी रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की हा परिसर संपूर्णपणे हादरला. या स्फोटाने लागलेल्या आगीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नजिकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत घनश्याम यादव ( ३६ ) तसेच देवेंद्र पाल ( २६ ) यांना ६० ते ७० टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. महेंद्र चौधरी ( ३२ ) यांना १० ते १२ टक्के भाजले आहे. तर संदीप पाल ( २० ) यांना ५ टक्के भाजले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा होत असताना घाटकोपरमध्ये अशी भयानक दुर्घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon