आरपीआई कार्यकर्ता विजय निकम बनला खंडणीखोर; पोलिसांच्या रडारवर ४ साथीदार

Spread the love

आरपीआई कार्यकर्ता विजय निकम बनला खंडणीखोर; पोलिसांच्या रडारवर ४ साथीदार

मुंबई – कुर्ल्यातील नेहरू नगर परिसरातील ठक्करबाप्पा कॉलनी, वत्सलाताई नाईक नगर आणि वसंत नगर भागात खंडणीखोरीचे थैमान माजवणाऱ्या तथाकथित आरपीआई कार्यकर्ता विजय निकमवर पोलिसांनी सलग तीन गुन्हे नोंदवले आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये आता प्रश्न उपस्थित होत आहे की, “कार्यकर्ता म्हणून ओळख असलेला विजय निकम गँगस्टर बनला आहे का?”

मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीतील घरमालकांकडून दुरुस्तीच्या निमित्ताने विजय निकम खंडणी मागत होता. या तक्रारीनंतर नेहरू नगर पोलिसांनी कारवाई करत काही दिवसांपूर्वी त्याला अटक केली होती. मात्र, जामिनावर सुटताच त्याने पुन्हा एका झोपडीधारकाकडे पैशाची मागणी केली. संतप्त नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर दुसऱ्यांदा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, या आठवड्यात तिसऱ्यांदा देखील खंडणीचा गुन्हा विजय निकमवर नोंद झाला असून, पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, निकमच्या टोळीत सुनीता, ओमप्रकाश, चिंदीचोर विजय यांच्यासह आणखी चार जणांचा समावेश असून, त्यांच्यावर देखील गुन्हे नोंदवण्याची तयारी सुरू आहे.

स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाला मागणी केली आहे की, सराईत खंडणीखोर विजय निकमला तातडीने हद्दपार करून परिसरातील दहशत संपवावी. पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, विजय निकम आणि त्याच्या साथीदारांवर लवकरच आणखी गुन्हे नोंदवले जाणार असून, संपूर्ण टोळीवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon