वडाळे तलाव परिसरातील रोड रोमियोंवर पोलिसांची धडक कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
पनवेल – वडाळे तलाव परिसरात वेगाने गाडी चालवणे, स्टंट करणे, मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे आणि मुलींना छेडछाड करणार्या रोड रोमियोंवर पोलिसांनी धडक कारवाई केली. भाजपचे उमेश इनामदार यांच्या पुढाकारामुळे पोलिस प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली.
वाहतूक शाखेचे निरीक्षक औदुंबर पाटील आणि शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शाकीर पटेल यांच्या उपस्थितीत अनेक युवकांना दंड ठोठावण्यात आला, तर काहींना कान पकडून माफी मागायला लावले गेले.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून, रोड रोमियोंना ही चांगलीच धडा शिकवली गेली असल्याची प्रतिक्रिया नोंदवली जात आहे.