ठाणे वाहतूक पोलिसांचे कौतुकास्पद काम; हरवलेला iPhone-16 आणि प्रवासी बॅग मालकांना परत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे नगर वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकाभिमुख कार्याची परंपरा जपली आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एका प्रवाशाचा iPhone-16 मोबाईल व प्रवासी बॅग हरवल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. तत्काळ सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलिसांनी हरवलेली वस्तू शोधून काढली.
सदर iPhone-16 व बॅग यशस्वीरित्या शोधून मूळ मालकांच्या ताब्यात सुखरूप परत करण्यात आली. ठाणे वाहतूक पोलिसांच्या या तत्पर आणि प्रामाणिक सेवेमुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांची सतर्कता, प्रामाणिकपणा आणि नागरिकाभिमुख सेवा हीच त्यांची खरी ताकद असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.