बुधवार पेठेत मौजमजा; मात्र ऑनलाईन पेमेंटसाठी पासवर्ड विसरला; तीन महिलांनी तरुणाला धू धू धुतलं!

Spread the love

बुधवार पेठेत मौजमजा; मात्र ऑनलाईन पेमेंटसाठी पासवर्ड विसरला; तीन महिलांनी तरुणाला धू धू धुतलं!

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : शहरात मारहाणीचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन पेमेंट करताना पासवर्ड विसरल्यामुळे एका ३९ वर्षीय व्यक्तीला तीन महिलांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवार पेठेतील लालबत्ती परिसरात १२ सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडली असून फारसखाना पोलीस ठाण्यात तिन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती तमन्ना शाहरुख मुलाना (३२) हिला भेटण्यासाठी लालबत्ती परिसरात गेला होता. भेटीनंतर त्याने ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ॲपचा पासवर्ड विसरल्याने त्याला पेमेंट करता आले नाही. त्याच्याजवळ रोख रक्कमही नव्हती तसेच फोन करून पैसे मागवण्याची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती.

यामुळे संतापलेल्या तमन्ना हिने सुरुवातीला तक्रारदाराला शिवीगाळ केली. त्यानंतर तिथे आलेल्या तिच्या दोन साथीदार महिला — तनुजा हाकिम अली मौल्ला (३४) आणि सोनिया गुलाम शेख (३२) यांनीही तमन्नासोबत मिळून त्या व्यक्तीला धू धू धुतले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पीडित व्यक्ती जखमी झाला.

यानंतर त्याने धाव घेत फारसखाना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिन्ही आरोपी महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon