कापूरबावडी पोलिसांचा पराक्रम; हरवलेली ५० हजारांची बॅग व मोबाईल शोधून महिलेस परत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाने जलद गतीने कामगिरी करत मनोरमा मार्केट परिसरात हरवलेली तब्बल ₹५०,००० रोख रक्कम व मोबाईल असलेली बॅग शोधून तक्रारदार महिलेस परत केली.
सदर महिला खरेदीसाठी मार्केट परिसरात गेल्या असता त्यांची मौल्यवान बॅग हरवली होती. त्वरित पोलिसांना माहिती मिळताच बीट मार्शल पथकाने परिसरात शोधमोहीम हाती घेतली. अल्पावधीतच बॅग सापडून ती सुरक्षितपणे संबंधित महिलेस सुपूर्द करण्यात आली.
या जलद कारवाईबद्दल नागरिकांनी कापूरबावडी पोलिसांचे व बीट मार्शलचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.